Skip to main content

Posts

Showing posts with the label कविता

ती...

आता तीच येणंही या पावसाच्या सरी सारख झालय... बिन भरवश्याच..! आपण डोळ्यात जीव आणून वाट पहावी निरंतर... मनातल्या उनाड पाखराने एका क्षणात गाठावं तिच्या पर्यंतच अंतर... तिला सवय... वाट पाहणाऱ्या डोळ्यांना आणखीनच आसुसलं करण्याची... कधीच भिजवत नाही ती मनमोकळ.... तिच्या सहवासने.. तरी तिचा तो सहवास... वाटतो आपल्याला हवाहवासा आणि निकडीचाही.. मिलनाच्या या दुष्काळाने छिन्न विछिन्न झालय हे मन... तू मुक्त होऊन बरस बंधनाच्या काळ्याकुट् आभाळातुन अन होउदे तृप्त एकदाची... ही मनाशी नाळ जोडलेली माती.. ती असली की वसंत फुलतो.... मन प्रसन्न.. चोहिकडे मखमली हिरवा गालिचा.. आपलं स्वत्व विसरून विरुन जावं तिच्यात अस वातावरण... ती पोटात तर ही मनात आग लावते विरहाची... आपणही बसतो गुमान.. वाट पाहत.. एक टक नजर लावून.... ती येईल या आसेवर.....      - निखिल